श्री गणपती स्थापना प्राणप्रप्तिष्ठा विधी

पुजा साहित्य यादी :   

     हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांडे, तांब्या, ताम्हण, नारळ-१, हार, फुले, केवडा, कमळ, सुट्टे पैसे/नाणी, *"जानवे जोड"*, दूर्वा, बेल, तुळशी, पत्री, (आघाडा, केणा, शमीपत्र, हराली), पाट/आसने, खारीक, बदाम, सुपाऱ्या, हळकुंडे (प्रत्येकी ५), विड्याची पाने १५, पळी भांडे, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर), उदबत्ती/धुप, कापूर, कापसाचे गेजवस्त्र/वस्त्रमाळ, फळे ५ प्रकरची, (सिझनेबल)

गणपतीचे तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला होईल अशी आरास करावी. क्वचित उत्तरेला चालेल परंतु त्यावेळी पूजा करणाऱ्या व्यक्तीने तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला होईल असे बसावे.
        गणपतीसमोर २ पानांचे ५ विडे मांडावेत. देठ देवाकडे करावेत. त्यावर खारीक, बदाम, सुपाऱ्या, हळकुंडे व सुट्टे पैसे ठेवावेत. आपल्या समोर डाव्या हाताला पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा. डाव्या हाताशी पळी- भांडे ताम्हण व उजव्या हाताला पूजा साहित्याचे ताट ठेवावे. गणपतीच्या मूर्ती खाली पाटावर वस्त्र घालावे व थोड्याशा अक्षदा ठेवाव्यात. ही सर्व तयारी पुरेशी आधी करावी म्हणजे पूजेच्या वेळी धावपळ/चिडचिड होणार नाही.

🔸 आचमन:

       डाव्या हातात पळी/(चमचा) घेऊन उजव्या हातावर पाणी घ्यावे. पहिल्या तीन नावांनी पाणी प्यावे.

१) केशवाय नमः      
२) नारायणाय नमः      
३) माधवाय नमः     
चवथ्या नावाला पाणी हातावरुन सरळ ताम्हणात सोडावे.
४) गोविंदाय नमः।
पुन्हा पहिल्या तीन नावांनी पाणी प्यावे चवथ्या नावाला हातावरुन सरळ ताम्हणात सोडावे.
नंतर पुढील नावे म्हणावीत.
५) विष्णवे नमः।
६) मधूसूदनाय नमः। 
७) त्रिविक्रमाय नमः।
८) वामनाय नमः। 
९) श्रीधराय नमः।
१०) हृषीकेषाय नमः।
११) पद्मनाभाय नमः।
१२) दामोदराय नमः।
१३) संकर्षणाय नमः । 
१४) वासुदेवाय नमः।
१५) प्रद्युम्नाय नमः।
१६) अनिरुद्धाय नमः।
१७) पुरुषोत्तमाय नमः।
१८) अधोक्षजाय नमः।
१९) नारसिंहाय नमः।
२०) अच्युताय नमः।
२१) जनार्दनाय नमः।  
२२) उपेंद्राय नमः।
२३) हरये नमः।
२४) श्रीकृष्णाय नमः।
         यानंतर मनामध्ये गणपती, कुलदेवता, आई वडिल गुरुंचे स्मरण करुन नमस्कार करावा. एक विडा देवापुढे ठेवून देवांना व घरातील वडीलधारी मोठ्याना नमस्कार करावा व पूजेला सुरुवात करावी. 

🔸 श्रीमन्महागणपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। एतद् कर्मप्रधानदेवता श्रीपार्थिव सिद्धीविनायकाय नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। अविघ्नमस्तु।

🔸संकल्प : आता उजव्या हातामध्ये थोड्या अक्षता घेऊन पुढील संकल्प करावा. श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णा वेण्ण्याः उत्तरे तीरे शालिवाहन शके शुभकृतनाम संवत्सर, रामक्षेत्रे राम रामाश्रमे अस्मिन् वर्तमाने शार्वरी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ सौम्यवासरे चित्रानक्षत्रे शुक्लयोगे बवकरणे कन्या राशि स्थिते चंद्रे सिंह राशिस्थिते सूर्ये धनु राशि स्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथा राशिस्थानानि स्थितेषु एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं (आपल्या गोत्राचा उच्चार करावा; गोत्र माहित नसल्यास काश्यप गोत्र घ्यावे) अहं अस्माकं सकल कुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं श्री सिद्धिविनायक कृपाप्रसाद प्राप्त्यर्थं प्रति वार्षिक विहितं पार्थिव सिद्धिविनायक व्रत अंगत्वेन श्री पार्थिव सिद्धीविनायक देवता प्रीत्यर्थं यथाशक्ति यथाज्ञानेन यथामिलित सामग्र्यां प्राणप्रतिष्ठापना पूर्वकं ध्यान आवाहनादि षोडशोपचार पूजनं अहं करिष्ये । हातावर पाणी घेऊन अक्षता ताम्हणात सोडाव्यात. आदौ निर्विघ्नता सिद्यर्थं महागणपति पूजनं/स्मरणं करिष्ये । पुन्हा एकदा हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.
🔸(आमच्या घरातील सर्वांना दीर्घायुष्य, आरोग्य, सुख-शांति, समाधान, ऐश्वर्य प्राप्त व्हावे म्हणून मी हे व्रत करत आहे, अशी भावना मनात ठेवावी.)

उजव्या हाताला तांदळावर एक सुपारी ठेवून त्याची गणपती समजून पुजा करावी. किंवा शक्य नसल्यास फक्त गणपतीचे स्मरण करुन नमस्कार करावा.

श्री महागणपतये नमः । ध्यायामि । सुपारीला अक्षता वहाव्यात. 
श्री महागणपतये नमः । आवाहयामि। पुन्हा अक्षता वहाव्यात. श्री महागणपतये नमः । गंध अक्षता पुष्पं समर्पयामि । एक फूल गंध अक्षतात बुडवून वहावे श्री महागणपतये नमः । हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि । हळदी कुंकु वहावे. 
श्री महागणपतये नमः । दुर्वांकुरं विल्वदलं पुष्पाणि च समर्पयामि । दुर्वा, बेल व फुले वहावीत.
श्री महागणपतये नमः । धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि । उदबत्ती नीरांजन ओवाळावे / दोन वेळा ताम्हणात पाणी सोडावे. श्री महागणपतये नमः । गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि । गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.
श्री महागणपतये नमः । मुखवासार्थे पूगीफल तांबूलं सुवर्ण पुष्प दक्षिणां समर्पयामि । पुढच्या विड्यावर व फळावर थेंबभर पाणी घालावे. श्री महागणपतये नमः । मंत्राक्षतां समर्पयामि । अक्षता वहाव्यात. श्री महागणपतये नमः । प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि । नमस्कार करावा. अनेन कृत पूजनेन श्री महागणपती प्रीयताम् । हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.
 
🔸कलशपूजा :
कलशस्य मुखे विष्णु: कंठे रुद्र: समाश्रित: मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा: स्मृता: ॥
कुक्षौ तु सागरा: सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा। ऋग्वेदोऽथ यजुर्वेद: सामवेदो ह्यथर्वण:। अंगैश्च सहिता: सर्वे कलशं तु समाश्रिताः । अत्र गायत्री सावित्री शांतिः पुष्टिकरी तथा । आयांतु देव पूजार्थ दुरितक्षयकारकाः ॥
गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वती । नर्मदे, सिंधु, कावेरि जलेऽस्मिन्‌ सन्निधिं कुरु || श्रीवरुणाय नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि ॥
शुद्ध पाण्याने भरलेल्या कलशाला गंध, अक्षता व फुले वाहावी.

🔸शंखपुजा :
शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता । पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगासरस्वती ॥ त्वं पुरा सागरोत्पन्नौ विष्णुना विधृतः करे । अग्रतः सर्वदेवानां पांचजन्य नमोऽस्तुते ॥
शंखदेवयायै नमः । सर्वोपचारार्थे गंध-पुष्प-तुलसीपत्रं समर्पयामि ॥
गंध, फुले, तुलसी शंखाला अर्पण करावी.

🔸घंटापूजा :

आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां । कुर्वे घंटा रवं तत्र देवताऽव्हानलक्षणम्‌ ॥
घंटायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥
घंटेला गंध, अक्षता, फुले वाहावी व घंटा वाजवावी.

🔸दीपपूजा :

भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यः । अतस्त्वां स्थापयाम्यत्र मम शांतिप्रदो भवो ॥ दीपदेवतायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥
समईला गंध, अक्षता, फूल वाहावे. नमस्कार करावा.
ह्यानंतर कलश, शंख, घंटा व दिव्याची गंध अक्षता फूल वाहून पूजा करावी व नमस्कार करावा.
पूजा केलेल्या कलशातील पाणी फुलाने किंवा तुळशीच्या पानाने स्वतःच्या अंगावर, मूर्तीवर आणि पूजा साहित्यावर शिंपडावे. नंतर गणपतीच्या मूर्तीवरील रुमाल/वस्त्र काढावे व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी.

प्राणप्रतिष्ठापना :

    सर्व प्रथम ह्या निर्जीव असणाऱ्या मातीच्या मूर्तीत देवाचे हात,पाय, डोळे इ. एकेक अवयव साकार होत आहेत आणि मूर्तीमध्ये प्राण येऊन ती सजीव होत आहे अशी मनामध्ये भावना करावी. मूर्तीच्या हृदयाला आपला उजवा हात लावून ठेवावा व पुढील मंत्र म्हणावा.

औं आं -हीं क्रों । अं यं रं लं वं शं सं हं ळं क्षं अः । क्रों -हीं आं हंसः सोऽहम् ॥ अस्यां मूर्तौ प्राण इह प्राणाः ॥
औं आं -हीं क्रों । अं यं रं लं वं शं सं हं ळं क्षं अः । क्रों -हीं आं हंसः सोऽहम् ॥ अस्यां मूर्तौ जीव इह स्थितः ॥
औं आं -हीं क्रों । अं यं रं लं वं शं सं हं ळं क्षं अः । क्रों -हीं आं हंसः सोऽहम् ॥ अस्यां मूर्तौ सर्वे इंद्रियाणि सुखं चिरं तिष्ठंतु नमः ॥ 

गर्भादानादि पंधरा संस्कार पूर्ण व्हावेत म्हणून पंधरा वेळा ‘-हीं ’ चा जप करावा . 
नंतर देवाच्या दोन्ही डोळ्यांना दूर्वाच्या काडीने तूप लावावे. 

’श्री सिद्धिविनायकाय नमः ’ असे म्हणत गंध अक्षता फूल हळदी-कुंकु वहावे. 'श्री सिद्धिविनायकाय नमः’ धूप समर्पयामि । दीपं दर्शयामि । असे म्हणत दोन वेळा ताम्हणात पाणी सोडावे. गुळखोबरे अथवा खडीसाखर किंवा साध्या साखरेचा नैवेद्य दाखवावा. 
पुढच्या विड्यावर पाणी सोडून देवाला नमस्कार करावा.
अनेन कृत पूजनेन श्री सिद्धिविनायकः प्रीयताम् । असे म्हणून ताम्हणात एकदा पाणी सोडावे.

🔸षोडशोपचार पूजन :
हातामध्ये दूर्वा किंवा अक्षता घेऊन मनामध्ये गणपतीचे ध्यान करावे, 
एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं । पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ॥

श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। ध्यायामि । दूर्वा किंवा अक्षता गणपतीच्या मूर्तीवर वहाव्यात, श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि । अक्षता वहाव्यात. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। आसनार्थे अक्षतां समर्पयामि । अक्षता वहाव्यात. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। पाद्यं समर्पयामि । फुलाने/दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। अर्घ्यं समर्पयामि । गंध अक्षता मिश्रित पाणी शिंपडावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। आचमनीयं समर्पयामि । फुलाने / दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। स्नानं समर्पयामि । फुलाने / दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। पंचामृत स्नानं समर्पयामि । फुलाने पंचामृत शिंपडावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। गंधोदक स्नानं समर्पयामि । फुलाने गंधमिश्रित पाणी शिंपडावे. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। शुद्धोदक स्नानं समर्पयामि । फुलाने/दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। पूजार्थे गंध अक्षता पुष्पं समर्पयामि । देवाला गंध, अक्षता, फूल वहावे. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। हरिद्रा कुंकुमं समर्पयामि। हळदी कुंकु वहावे. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि । उदबत्ती निरंजन ओवाळून 
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नैवेद्यार्थे पंचामृत नैवेद्यं समर्पयामि। पंचामृताचा नैवेद्य दाखवावा श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। पूगीफल तांबूल सुवर्णपुष्प दक्षिणां समर्पयामि। पुढच्या विड्यावर पाणी घालावे. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। मंत्राक्षतां समर्पयामि। अक्षता वहाव्यात.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि। देवाला नमस्कार करावा. अनेन पंचामृत पूजनेन श्री सिद्धिविनायकः प्रीयताम् । ताम्हणात एक पळीभर पाणी सोडावे.

🔸अभिषेक :

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थसिद्धये ॥ १॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः । न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् । पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् । संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥
अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् । तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥                   

🔸अथर्वशीर्ष
गणपति अथर्वशीर्ष

ॐ नमस्ते गणपतये।
त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि।।
त्वमेव केवलं कर्त्ताऽसि।
त्वमेव केवलं धर्तासि।।
त्वमेव केवलं हर्ताऽसि।
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि।।
त्वं साक्षादत्मासि नित्यम्।
ऋतं वच्मि।। सत्यं वच्मि।।
अव त्वं मां।। अव वक्तारं।।
अव श्रोतारं। अवदातारं।।
अव धातारम अवानूचानमवशिष्यं।।
अव पश्चातात्।। अवं पुरस्तात्।।
अवोत्तरातात्।। अव दक्षिणात्तात्।।
अव चोर्ध्वात्तात।। अवाधरात्तात।।
सर्वतो मां पाहिपाहि समंतात् ।।३।।
त्वं वाङग्मयचस्त्वं चिन्मय।
त्वं वाङग्मयचस्त्वं ब्रह्ममय:।।
त्वं सच्चिदानंदा द्वितियोऽसि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि |।४।|
सर्व जगदि‍दं त्वत्तो जायते।
सर्व जगदिदं त्वत्तस्तिष्ठति।
सर्व जगदिदं त्वयि लयमेष्यति।।
सर्व जगदिदं त्वयि प्रत्येति।।
त्वं भूमिरापोनलोऽनिलो नभ:।।
त्वं चत्वारिवाक्पदानी ।।५।।
त्वं गुणयत्रयातीत: त्वमवस्थात्रयातीत:।
त्वं देहत्रयातीत: त्वं कालत्रयातीत:।
त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं।
त्वं शक्ति त्रयात्मक:।।
त्वां योगिनो ध्यायंति नित्यम्।
त्वं शक्तित्रयात्मक:।।
त्वां योगिनो ध्यायंति नित्यं।
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं।
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम् ।।६।।
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं।।
अनुस्वार: परतर:।। 
अर्धेन्दुलसितं ।।
तारेण ऋद्धं।। एतत्तव मनुस्वरूपं।।
गकार: पूर्व रूपं अकारो मध्यरूपं।
अनुस्वारश्चान्त्य रूपं।। बिन्दुरूत्तर रूपं।।
नाद: संधानं।। संहिता संधि: सैषा गणेश विद्या।।
गणक ऋषि: निचृद्रायत्रीछंद:।। ग‍णपति देवता।।
ॐ गं गणपतये नम: ।।७।।
एकदंताय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदंती प्रचोद्यात।।
एकदंत चतुर्हस्तं पारामंकुशधारिणम्।।
रदं च वरदं च हस्तै र्विभ्राणं मूषक ध्वजम्।।
रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्।।
रक्त गंधाऽनुलिप्तागं रक्तपुष्पै सुपूजितम्।।८।।
भक्तानुकंपिन देवं जगत्कारणम्च्युतम्।।
आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृतै: पुरुषात्परम।।
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनांवर:।। ९।।
नमो व्रातपतये नमो गणपतये।। नम: प्रथमपत्तये।।
नमस्तेऽस्तु लंबोदारायैकदंताय विघ्ननाशिने शिव सुताय।
श्री वरदमूर्तये नमोनम: ।।१०।।

देवाला वाहिलेले फूल उचलून त्याचा वास घेऊन उत्तर दिशेला टाकावे व अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र (प्रणम्य शिरसा देवं) म्हणत देवाला अभिषेक करावा. दोन्ही येत नसल्यास २१ वेळा *"गं गणपतये नमः"* असे म्हणत अभिषेक करावा. नंतर देवाला फुलाने वासाचे तेल किंवा अत्तर लावून किंचित गरम पाणी शिंपडावे व पुन्हा चांगले पाणी शिंपडावे. मूर्ती हलक्या हाताने स्वच्छ पुसुन जागेवर ठेवावी. पुढील पूजा करण्यापूर्वी मूर्ती नीट योग्य ठिकाणी बसली आहे ह्याची खात्री करावी. कोणत्याही कारणास्तव पुन्हा मूर्ती हलवू नये.

श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। सुप्रतिष्टितमस्तु । (अक्षता वहाव्यात ) श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। वस्त्र उपवस्त्रं समर्पयामि । ( प्रत्यक्ष वस्त्र किंवा अक्षता वहाव्यात)
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। यज्ञोपवीतं समर्पयामि । (चित्रात दाखविल्याप्रमाणे गणपती देवाच्या डाव्या खांद्यावरुन उजवीकडे *"जानवे"* घालावे. नसल्यास अक्षता वहाव्यात.) श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि । (गंध लावावे)
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि । (अक्षता वहाव्यात) 
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। हरिद्रा कुंकुमं समर्पयामि । (हळदी कुंकु वहावे) 
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नानाविध परिमल द्रव्याणि समर्पयामि । (शेंदूर, गुलाल, बुक्का इ. वहावे) 
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नानाविध पुष्पाणि पुष्पमालां च समर्पयामि । (फुले वहावीत व हार घालावा)

अंगपूजा :

खालील नावांनी गणपतीला पायापासून डोक्यापर्यंत एकेका अवयवावर अक्षता वहाव्यात.
१) गणेश्वराय नमः ।
पादौ पूजयामि 
२) विघ्नराजाय नमः ।
जानुनी पूजयामि  
३) आखुवाहनाय नमः।   
ऊरु पूजयामि  
४) हेरंबाय नमः।
कटिं पूजयामि   
५) लंबोदराय नमः। 
उदरं पूजयामि
६) गौरीसुताय नमः ।
स्तनौ पूजयामि     
७) गणनायकाय नमः ।
हृदयं पूजयामि
८) स्थूलकंठाय नमः ।
कंठं पूजयामि  
९) स्कंधाग्रजाय नमः ।
स्कंधौ पूजयामि  
१०) पाशहस्ताय नमः ।
हस्तौ पूजयामि
११) गजवक्त्राय नमः ।
वक्त्रं पूजयामि     
१२) विघ्नहर्त्रे नमः ।
ललाटं पूजयामि
१३) सर्वेश्वराय नमः।
शिरः पूजयामि
१४) गणाधिपाय नमः।
सर्वांगं पूजयामि |

श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नानाविध पत्राणि समर्पयामि । (पत्री वहाव्यात) 
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। धूपं समर्पयामि । दीपं दर्शयामि । (उदबत्ती व निरंजन ओवाळावे) 
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नैवेद्यं समर्पयामि । (पंचखाद्य/मोदक किंवा पेढे यांचा नैवेद्य दाखवावा ) 
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। उत्तरापोशनं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं समर्पयामि। (तीन वेळा ताम्हणात पाणी सोडावे ) 
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि । (फुलाने गंध वहावे ) 
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। मुखवासार्थे पूगीफल तांबूलं समर्पयामि। (पुढच्या विड्यावर पाणी घालावे) 
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। सुवर्ण पुष्पं दक्षिणां समर्पयामि । (देवापुढे दक्षिणा ठेवून पाणी घालावे) 
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। फलं समर्पयामि । (नारळावर व फळांवर थेंब थेंब पाणी घालावे) 
पुढील प्रत्येक नावाला दोन-दोन दूर्वा गंधात बुडवून वहाव्यात.

१) गणाधिपाय नमः।
दूर्वा युग्मं समर्पयामि । 
२)उमापुत्राय नमः।
दूर्वा युग्मं समर्पयामि ।
३)अघनाशनाय नमः। 
दूर्वा युग्मं समर्पयामि । 
४) विनायकाय नमः।
दूर्वा युग्मं समर्पयामि ।
५) ईशपुत्राय नमः।
दूर्वा युग्मं समर्पयामि ।
६) सर्वसिद्धिप्रदायकाय नमः।
दूर्वा युग्मं समर्पयामि ।   
७) एकदंताय नमः।
दूर्वा युग्मं समर्पयामि । 
८) इभवक्त्राय नमः।
दूर्वा युग्मं समर्पयामि ।
९)आखुवाहनाय नमः।
दूर्वा युग्मं समर्पयामि ।
१०) कुमार गुरवे नमः।
दूर्वा युग्मं समर्पयामि ।

पुढील दोन मंत्रांनी एक दूर्वा वहावी. 
गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्र अघनाशन। एकदंत इभवक्त्रेति तथा च मूषक वाहन ॥
विनायक ईशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक । कुमार गुरवे नित्यं पूजनीय प्रयत्नतः ॥ दुर्वामेकां समर्पयामि । 

यानंतर निरांजन/कापूर लावून आरती करावी.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। प्रदक्षिणापूर्वक नमस्कारं समर्पयामि । (प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा) 
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि । (हातात फुले व अक्षता घेऊन मंत्रपुष्पांजली म्हणून ती फुले वहावीत. मंत्रपुष्पांजली येत नसल्यास ’वक्रतुंड महाकाय' श्लोक म्हणावा) 

यानंतर पुढील मंत्र म्हणून नमस्कार करावा.
आवाहनं न जानामि न जानामि तव अर्चनं । पूजां चैव जानामि क्षम्यतां परमेश्वर ॥
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि । १०८ मंत्राने गणपती ला दुर्वा वहाव्यात:

गणपतीची १०८ नावे व मंत्र :

गजानन ॐ गजाननाय नमः। गणाध्यक्ष ॐ गणाध्यक्षाय नमः। विघ्नराज ॐ विघ्नराजाय नमः। विनायक ॐ विनायकाय नमः। द्वैमातुर ॐ द्वैमातुराय नमः। द्विमुख ॐ द्विमुखाय नमः। प्रमुख ॐ प्रमुखाय नमः। सुमुख ॐ सुमुखाय नमः। कृति ॐ कृतिने नमः। सुप्रदीप ॐ सुप्रदीपाय नमः। सुखनिधी ॐ सुखनिधये नमः। सुराध्यक्ष ॐ सुराध्यक्षाय नमः। सुरारिघ्न ॐ सुरारिघ्नाय नमः। महागणपति ॐ महागणपतये नमः। मान्या ॐ मान्याय नमः। महाकाल ॐ महाकालाय नमः। महाबला ॐ महाबलाय नमः। हेरम्ब ॐ हेरम्बाय नमः। लम्बजठर ॐ लम्बजठरायै नमः। ह्रस्वग्रीव ॐ ह्रस्व ग्रीवाय नमः। महोदरा ॐ महोदराय नमः। मदोत्कट ॐ मदोत्कटाय नमः। महावीर ॐ महावीराय नमः। मन्त्रिणे ॐ मन्त्रिणे नमः। मङ्गल स्वरा ॐ मङ्गल स्वराय नमः। प्रमधा ॐ प्रमधाय नमः। प्रथम ॐ प्रथमाय नमः। प्रज्ञा ॐ प्राज्ञाय नमः। विघ्नकर्ता ॐ विघ्नकर्त्रे नमः। विघ्नहर्ता ॐ विघ्नहर्त्रे नमः। विश्वनेत्र ॐ विश्वनेत्रे नमः। विराट्पति ॐ विराट्पतये नमः। श्रीपति ॐ श्रीपतये नमः। वाक्पति ॐ वाक्पतये नमः। शृङ्गारिण ॐ शृङ्गारिणे नमः। अश्रितवत्सल ॐ अश्रितवत्सलाय नमः। शिवप्रिय ॐ शिवप्रियाय नमः। शीघ्रकारिण ॐ शीघ्रकारिणे नमः। शाश्वत ॐ शाश्वताय नमः। बल ॐ बल नमः। बलोत्थिताय ॐ बलोत्थिताय नमः। भवात्मजाय ॐ भवात्मजाय नमः। पुराण पुरुष ॐ पुराण पुरुषाय नमः। पूष्णे ॐ पूष्णे नमः। पुष्करोत्षिप्त वारिणे ॐ पुष्करोत्षिप्त वारिणे नमः। अग्रगण्याय ॐ अग्रगण्याय नमः। अग्रपूज्याय ॐ अग्रपूज्याय नमः। अग्रगामिने ॐ अग्रगामिने नमः। मन्त्रकृते ॐ मन्त्रकृते नमः। चामीकरप्रभाय ॐ चामीकरप्रभाय नमः। सर्वाय ॐ सर्वाय नमः। सर्वोपास्याय ॐ सर्वोपास्याय नमः। सर्व कर्त्रे ॐ सर्व कर्त्रे नमः। सर्वनेत्रे ॐ सर्वनेत्रे नमः। सर्वसिद्धिप्रदाय ॐ सर्वसिद्धिप्रदाय नमः। सिद्धये ॐ सिद्धये नमः। पञ्चहस्ताय ॐ पञ्चहस्ताय नमः। पार्वतीनन्दनाय ॐ पार्वतीनन्दनाय नमः। प्रभवे ॐ प्रभवे नमः। कुमारगुरवे ॐ कुमारगुरवे नमः। अक्षोभ्याय ॐ अक्षोभ्याय नमः। कुञ्जरासुर भञ्जनाय ॐ कुञ्जरासुर भञ्जनाय नमः। प्रमोदाय ॐ प्रमोदाय नमः। मोदकप्रियाय ॐ मोदकप्रियाय नमः। कान्तिमते ॐ कान्तिमते नमः। धृतिमते ॐ धृतिमते नमः। कामिने ॐ कामिने नमः। कपित्थपनसप्रियाय ॐ कपित्थपनसप्रियाय नमः। ब्रह्मचारिणे ॐ ब्रह्मचारिणे नमः। ब्रह्मरूपिणे ॐ ब्रह्मरूपिणे नमः। ब्रह्मविद्यादि दानभुवे ॐ ब्रह्मविद्यादि दानभुवे नमः। जिष्णवे ॐ जिष्णवे नमः। विष्णुप्रियाय ॐ विष्णुप्रियाय नमः। भक्त जीविताय ॐ भक्त जीविताय नमः। जितमन्मधाय ॐ जितमन्मधाय नमः। ऐश्वर्यकारणाय ॐ ऐश्वर्यकारणाय नमः। ज्यायसे ॐ ज्यायसे नमः। यक्षकिन्नेर सेविताय ॐ यक्षकिन्नेर सेविताय नमः। गङ्गा सुताय ॐ गङ्गा सुताय नमः। गणाधीशाय ॐ गणाधीशाय नमः। गम्भीर निनदाय ॐ गम्भीर निनदाय नमः। वटवे ॐ वटवे नमः। अभीष्टवरदाय ॐ अभीष्टवरदाय नमः। ज्योतिषे ॐ ज्योतिषे नमः। भक्तनिधये ॐ भक्तनिधये नमः। भावगम्याय ॐ भावगम्याय नमः। मङ्गलप्रदाय ॐ मङ्गलप्रदाय नमः। अव्यक्ताय ॐ अव्यक्ताय नमः। अप्राकृत पराक्रमाय ॐ अप्राकृत पराक्रमाय नमः। सत्यधर्मिणे ॐ सत्यधर्मिणे नमः। सखये ॐ सखये नमः। सरसाम्बुनिधये ॐ सरसाम्बुनिधये नमः। महेशाय ॐ महेशाय नमः। दिव्याङ्गाय ॐ दिव्याङ्गाय नमः। मणिकिङ्किणी मेखालाय ॐ मणिकिङ्किणी मेखालाय नमः। समस्त देवता मूर्तये ॐ समस्त देवता मूर्तये नमः। सहिष्णवे ॐ सहिष्णवे नमः। सततोत्थिताय ॐ सततोत्थिताय नमः। विघातकारिणे ॐ विघातकारिणे नमः। विश्वग्दृशे ॐ विश्वग्दृशे नमः। विश्वरक्षाकृते ॐ विश्वरक्षाकृते नमः। कल्याणगुरवे ॐ कल्याणगुरवे नमः। उन्मत्तवेषाय ॐ उन्मत्तवेषाय नमः। अपराजिते ॐ अपराजिते नमः। समस्त जगदाधाराय ॐ समस्त जगदाधाराय नमः। सर्वैश्वर्यप्रदाय ॐ सर्वैश्वर्यप्रदाय नमः। आक्रान्त चिद चित्प्रभवे ॐ आक्रान्त चिद चित्प्रभवे नमः। श्री विघ्नेश्वराय ॐ श्री विघ्नेश्वराय नमः।
(पूजा कशी करायची मला माहित नाही. जसे माझ्या मनात आले तशी मी केली. काही चुकले असेल राहिले असेल तर माफ करा आणि सर्वांच्या घरात कायम सुख शांती समृद्धी राहू दे अशी प्रार्थना करावी.)

सर्वांनी श्रद्धापूर्वक तीर्थ प्रसाद घ्यावा. 

पूजेचे संपूर्ण फल प्राप्त व्हावे यासाठी गुरुजींना दक्षिणा व तुपात तळलेल्या मोदकाचे वायन द्यावे.
 

🔸दररोजची पूजा
(जितके दिवस आपल्या कुळातील नियम असेल त्यानुसार दररोज दोन्ही वेळा पुजा आरती करावा, घरातील शिजवलेल्या अन्नाचा बाप्पाला नैवेद्य दाखवावा, *उपाशी ठेवु नये* कारण आपण आव्हान करुन त्यांना आपल्या घरी बोलावले आहे,

श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। या मंत्राने दररोज सकाळ - संध्याकाळ गंध, अक्षता, फुले, दुर्वा वाहून पूजा करावी.
उदबत्ती निरंजन ओवाळून नैवेद्य दाखवावा व आरती करावी.

🔸उत्तरपूजन : अनंत चतुर्दशी

     श्री पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थं यथाशक्ती उत्तरपूजनं अहं करिष्ये असा संकल्प सोडून गंध, अक्षता, फुले, दुर्वा वाहून पूजा करावी. उदबत्ती निरंजन ओवाळून दही पोहे/दही भात किंवा खिरापत इ. नैवेद्य दाखवावा व आरती करावी. 
यांतु देवगणाः सर्वे पूजां आदाय पार्थिवीम् । इष्ट कामना सिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ॥ 

ह्या मंत्राने अक्षता वाहून मूर्ती थोडीशी उत्तर दिशेला हलवावी. नंतर विसर्जना करिता नदी अथवा जलाशयावर घेऊन जावी. किंवा मातीची मुर्ती असेल तर मोठ्या कुंडीमधे पाणी घालुन, घरीच विर्सजन करावे.

आरती साईबाबा

 आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा।

चरणरजातली । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।। आ०।।ध्रु ०।।

जाळुनियां अनंग। स्वस्वरूपी राहेदंग ।

मुमुक्षूजनां दावी । निज डोळा श्रीरंग ।। आ०।। १ ।।

जयामनी जैसा भाव । तया तैसा अनुभव ।

दाविसी दयाघना । ऐसी तुझीही माव ।। आ०।। २ ।।

तुमचे नाम ध्याता । हरे संस्कृती व्यथा ।

अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ।। आ०।। ३ ।।

कलियुगी अवतार । सगुण परब्रह्मः साचार ।

अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ।। द०।। आ०।। ४ ।।

आठा दिवसा गुरुवारी । भक्त करिती वारी ।

प्रभुपद पहावया । भवभय निवारी ।। आ०।। ५ ।।

माझा निजद्रव्यठेवा । तव चरणरज सेवा ।

मागणे हेचि आता । तुम्हा देवाधिदेवा ।। आ०।। ६ ।।

इच्छित दिन चातक। निर्मल तोय निजसुख ।

पाजावे माधवा या । सांभाळ आपुली भाक ।। आ०।। ७ ।।

श्रीगणेशोत्सवातील आरती

श्री गणपती स्थापना प्राणप्रप्तिष्ठा विधी

श्रीगणपतीची आरती

१. सुखकर्ता दुःखहर्ता

२. नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमीपत्रें

३. उंदिरावरी बैसोनी

४. शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको

५. तूं सुखकर्ता तूं दुखहर्ता विघ्नविनाशक मोरया

६. गजानना श्री गणराया

७. श्रीगणराजाची आरती


श्रीशंकरची आरती

१. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा


श्रीदेवीची आरती

१. दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी


श्रीदत्तात्रेयाची आरती

१. त्रिगुणत्मक त्रैमूर्ती दत्ता हा जाणा


श्रीविठ्ठलाची आरती

१. युगे अठ्ठावीस विटेवरी उभा

१. येई हो विठ्ठले माझे माऊली ये


श्रीविष्णूची आरती

१. श्रीदशावताराची आरती

२. ॐ जय जगदीश हरे


श्रीसंतांची आरती

१. आरती ज्ञानराजा

२. आरती तुकाराम

३. आरती रामदास


तुळशीची आरती

१. जय देवी जय देवी जयं माये तुळशी

२. तुळसीमूळमृत्तिका जो लावी भाळीं 

३. वृंदावनवासी जय माये तुळसी


श्रीमंगळागौरीची आरती

१. श्रीमंगळागौरीची आरती (जयदेवी मंगळागौरी ओंवाळीन सोनिया ताटीं)

२. श्रीमंगळागौरीची आरती (जय माये मंगळागौरी)

३. श्रीमंगळागौरीची आरती (ओवाळू आरतीला मंगळागौरी तुजला)

४. श्रीमंगळागौरीची आरती (मागू शाश्वत सौभाग्याप्रति गौरीला)

५. श्रीमंगळागौरीची आरती (जयदेवी मंगळागौरी)


इतर आरती

१. श्रीहरितालिकेली आरती

२. संतोषी मातेची आरती

३. श्रीकृष्णाची आरती (ओंवाळं आरती मदनगोपाळा)

४. आरती साईबाबा

५. श्रीमारुतीची आरती

६. घालीन लोटांगण

७. निरोपगीत (जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा)


श्रीगणपतीचे श्लोक आणि स्तोत्र

१. श्रीगणपती स्तोत्र ( संस्कृत अनुवाद )

२. जयजयाजी गणपती (गणपतीस्तोत्र)

३. श्रीगणपती स्तोत्र ( मराठी अनुवाद )

४. श्रीगणपतीचे श्लोक

५. श्रीमत दासबोध : समास पहिला आणि समास दुसरा : गणेशस्तवन

६. पसायदान


श्रीगणपतीचे श्लोक

घोर हा नको फार कष्टलो |

निजहितास मी व्यर्थ गुंतलो |

वारि शीघ्र संसार यातना |

हे दयानिधे श्रीगजानना || १ ||

विषय गोड हे लागले मला |

यामुळे असे घात आपुला |

कळुनिया असें भ्रांति जाईना |

हे दयानिधे श्रीगजानना || २ ||

त्रिविध ताप हा जाळितो अती |

काम क्रोध हे जाण पीडती |

चित्त सर्वथा स्वस्थ राहिना |

हे दयानिधे श्रीगजानना || ३ ||

स्त्रीधनादि हे आठवे मनी |

छंद हाच रे दिवसयामिनी |

विसरलो तुला दीनपालना |

हे दयानिधे श्रीगजानना || ४ ||

माउली पिता बंधुसोयरा |

तूंचि आमुचा निश्चये खरा |

शरण तूज मी विघ्नभंजना |

हे दयानिधे श्रीगजानना || ५ ||

म्हणवितो तुझा दास या जनी |

सकळ व्यापका जाणशी मनी |

भुक्ती मुक्ती दे भक्तपालना |

हे दयानिधे श्रीगजानना || ६ ||

काय काय रे साधनें करू |

मी असे तुझे मूर्ख लेकरु |

विटंबिती मला द्वैतभावना |

हे दयानिधे श्रीगजानना || ७ ||

विषयचिंतनें शोक पावलों |

देह बुध्दीने व्यर्थ नाडलों |

भालचंद्रजी तोड़ी बंधना |

हे दयानिधे श्रीगजानना || ८ ||

गजमुखा तुझी वाट पहातां |

नेत्र शीणले जाण तत्त्वतां |

भेटसी कधी भ्रमनिवारणा |

हे दयानिधे श्रीगजानना || ९ ||

प्रभु समर्थ तू आमुचे शिरी |

वेष्टिलों असे विषयापामरीं |

नवल हेंचि रे वाटते मना |

हे दयानिधे श्रीगजानना || १० ||

अगुण अद्वया तू परात्परा |

पार नेणवे विधि हरीहरां |

अचल निर्मला नित्य निर्गुणा |

हे दयानिधे श्रीगजानना || ११ ||

जिवन व्यर्थ हे तूज वेगळे |

स्वहित आपुले काम साधिले |

सुख नसे सदा मोहयातना |

हे दयानिधे श्रीगजानना || १२ ||

फारसे मला बोलता न ये |

पाउले तुझे देखिलीं स्वये |

मांडिली असे बहुत वल्गना |

हे दयानिधे श्रीगजानना || १३ ||

दीनबंधू हे ब्रीद आपुले |

साच तूं करीं दाविं पाउले |

मंगलालया विश्वजीवना |

हे दयानिधे श्रीगजानना || १४ ||

नाशिवंत रे सर्व संपदा |

हे नको मला पाव एकदा |

क्षेम देउनी चित्तरंजना |

हे दयानिधे श्रीगजानना || १५ ||

जातसे घडी पळ युगापरी |

लागली तुझी खंती अंतरी |

स्वामी आपुला विरह साहिना |

हे दयानिधे श्रीगजानना || १६ ||

कळेल तें करी विनविणे किती |

तारी अथवा मारीं गणपती |

सकलदोष अन संकष्टनाशना |

हे दयानिधे श्रीगजानना || १७ ||

आवडे मला त्रिभुवनाकृती |

पूजुनी बरी करीन आरती |

धांव पांव रे मोदकाशना |

हे दयानिधे श्रीगजानना || १८ ||

हृदय कठीण तूं न करि सर्वथा |

अंत आमुचा बघसी पुरता |

सिद्धिवल्लभा मूषकवाहना |

हे दयानिधे श्रीगजानना || १९ ||

कल्पवृक्ष तू कामधेनु वा |

लाविजे स्तनीं जीविंच्या जिवा |

हाचि हेत रे शेषभूषणा |

हे दयानिधे श्रीगजानना || २० ||

गणपति तुझे नाम चांगले |

आवड़ी बहू चित्त रंगले |

प्रार्थना तुझी गौरीनंदना |

हे दयानिधे श्रीगजानना || २१ ||

तारिं मोरया दुःखसागरीं |

गोसावीनंदन प्रार्थना करी |

आत्मया मनी जाण चिद्घना |

हे दयानिधे श्रीगजानना || २२ ||

जयजयाजी गणपती (गणपतीस्तोत्र)

जयजयाजी गणपती, मज द्यावी विपुल मती ।

करावया तुमची स्तुती, स्फूर्ती द्यावी मज अपार ।।


तुझे नाम मंगलमूर्ती, तुज इंद्रचंद्र ध्याती ।

विष्णू शंकर तुज पुजिती, अव्यया ध्याती नित्यकाळी ॥


तुझे नाम विनायक, गजवदना तू मंगलदायक ।

सकल विघ्ने कलिमलदाहक, नामस्मरणे भस्म होती ॥


मी तव चरणांचा अंकीत, तव चरणामाजी प्रणिपात ।

देवाधीदेवा तू एकदंत, परिसे विज्ञापना एक माझी ॥


माझा लडीवाळ तुज करणे, सर्वांपरी तू मज सांभाळणे ।

संकटामाजी रक्षीणे, सर्व करणे तुज स्वामी ॥


गौरिपुत्रा तू गणपती, परिसावी सेवकांची विनंती ।

मी तुमचा चरणार्थी, रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया ॥


तूच माझा माय बाप, तूच माझा देवराय ।

तूच माझी करिशी सोय, अनाथनाथ गणापती ॥


गजवदना श्री लंबोदरा, सिद्धीविनायका भालचंद्रा l

हेरंबा शिवपुत्रा, विश्वेश्वरा अनाथबंधू ॥


भक्तपालका करी करुणा, वरदमूर्ती गजानना ।

परशुहस्ता सिंदुरवर्णा, विघ्ननाशका विश्वमूर्ती ॥


विश्ववदना विघ्नेश्वरा, मंगलाधीशा परशुधरा ।

पापमोचना सर्वेश्वरा, दीनबंधु नमन माझे ॥


नमन माझे विघ्नहर्ता, नमन माझे एकदंता ।

नमन माझे गिरिजासुता, तुज स्वामिया नमन माझे ॥


नाही आशा स्तुतिची, नाही आशा तव भक्तिची ।

सर्व प्रकारे तुझिया दर्शनाची, आशा मनी उपजली ॥


मी केवळ मूढ अज्ञान, ध्यानी तुझे सदा चरण ।

लंबोदरा मज देई दर्शन, कृपा करी जगदीशा ॥


मतीमंद मी बालक, तूची सर्वांचा चालक ।

भक्तजनांचा पालक, गजमुखा तू होसी ॥


मी दरिद्री अभागी स्वामी, चित्त जडावे तुझिया नामी ।

अनन्यशरण तुजला मी, दर्शन देई कृपाळुवा ॥


हे गणपतीस्त्रोत्र जो करी पठण, त्यासी स्वामी देई अपार धन ।

विद्यासिद्धीचे अगाध ज्ञान, सिंदुरवदन देईल पै ॥


त्यासी पिशाच्च भूत प्रेत, न बाधिती कदाकाळात ।

स्वामिची पुजा करोनी यथास्तित, स्तुतिस्त्रोत्र हे जपावे ॥


होईल सिद्धी षण्मास हे जपता, नव्हे कदा असत्य वार्ता ।

गणपतीचरणी माथा, दिवाकरे ठेविला ॥


इति श्री गणपतीस्तोत्रं संपूर्णम्। श्री गजाननार्पणमस्तु।

श्रीगणपती स्तोत्र ( मराठी अनुवाद )

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |
तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||

पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |
सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||

नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |
अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||

देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |
विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||

विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |
पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||

जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |
श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||

श्रीमत दासबोध : समास पहिला आणि समास दुसरा : गणेशस्तवन

 दशक पहिला : स्तवननाम

समास दुसरा : गणेशस्तवन

॥ श्रीराम समर्थ ॥

ॐ नमोजि गणनायेका । सर्व सिद्धिफळदायेका ।

अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरूपा ॥ १॥

माझिये अंतरीं भरावें । सर्वकाळ वास्तव्य करावें ।

मज वाग्सुंन्यास वदवावें । कृपाकटाक्षेंकरूनी ॥ २॥

तुझिये कृपेचेनि बळें । वितुळती भ्रांतीचीं पडळें ।

आणी विश्वभक्षक काळें । दास्यत्व कीजे ॥ ३॥

येतां कृपेची निज उडी । विघ्नें कापती बापुडीं ।

होऊन जाती देशधडी । नाममात्रें ॥ ४॥

म्हणौन नामें विघ्नहर । आम्हां अनाथांचे माहेर ।

आदिकरूनी हरीहर । अमर वंदिती ॥ ५॥

वंदूनियां मंगळनिधी । कार्य करितां सर्वसिद्धी ।

आघात अडथाळे उपाधी । बाधूं सकेना ॥ ६॥

जयाचें आठवितां ध्यान । वाटे परम समाधान ।

नेत्रीं रिघोनियां मन । पांगुळे सर्वांगी ॥ ७॥

सगुण रूपाची टेव । माहा लावण्य लाघव ।

नृत्य करितां सकळ देव । तटस्त होती ॥ ८॥

सर्वकाळ मदोन्मत्त । सदा आनंदे डुल्लत ।

हरूषें निर्भर उद्दित । सुप्रसन्नवदनु ॥ ९॥

भव्यरूप वितंड । भीममूर्ति माहा प्रचंड ।

विस्तीर्ण मस्तकीं उदंड । सिंधूर चर्चिला ॥ १०॥

नाना सुगंध परिमळें । थबथबा गळती गंडस्थळें ।

तेथें आलीं षट्पदकुळें । झुंकारशब्दें ॥ ११॥

मुर्डीव शुंडादंड सरळे । शोभे अभिनव आवाळें ।

लंबित अधर तिक्षण गळे । क्षणक्ष्णा मंदसत्वी ॥ १२॥

चौदा विद्यांचा गोसांवी । हरस्व लोचन ते हिलावी ।

लवलवित फडकावी । फडै फडै कर्णथापा ॥ १३॥

रत्नखचित मुगुटीं झळाळ । नाना सुरंग फांकती कीळ ।

कुंडलें तळपती नीळ । वरी जडिले झमकती ॥ १४॥

दंत शुभ्र सद्दट । रत्नखचित हेमकट्ट ।

तया तळवटीं पत्रें नीट । तळपती लघु लघु ॥ १५॥

लवथवित मलपे दोंद । वेष्टित कट्ट नागबंद ।

क्षुद्र घंटिका मंद मंद । वाजती झणत्कारें ॥ १६॥

चतुर्भुज लंबोदर । कासे कासिला पितांबर ।

फडके दोंदिचा फणीवर । धुधूकार टाकी ॥ १७॥

डोलवी मस्तक जिव्हा लाळी । घालून बैसला वेटाळी ।

उभारोनि नाभिकमळीं । टकमकां पाहे ॥ १८॥

नाना याति कुशुममाळा । व्याळपरियंत रुळती गळां ।

रत्नजडित हृदयकमळा- । वरी पदक शोभे ॥ १९॥

शोभे फरश आणी कमळ । अंकुश तिक्षण तेजाळ ।

येके करीं मोदकगोळ । तयावरी अति प्रीति ॥ २०॥

नट नाट्य कळा कुंसरी । नाना छंदें नृत्य करी ।

टाळ मृदांग भरोवरी । उपांग हुंकारे ॥ २१॥

स्थिरता नाहीं येक क्षण । चपळविशईं अग्रगण ।

साअजिरी मूर्ति सुलक्षण । लावण्यखाणी ॥ २२॥

रुणझुणा वाजती नेपुरें । वांकी बोभाटती गजरें ।

घागरियासहित मनोहरें । पाउलें दोनी ॥ २३॥

ईश्वरसभेसी आली शोभा । दिव्यांबरांची फांकली प्रभा ।

साहित्यविशईं सुल्लभा । अष्टनायका होती ॥ २४॥

ऐसा सर्वांगे सुंदरु । सकळ विद्यांचा आगरु ।

त्यासी माझा नमस्कारु । साष्टांग भावें ॥ २५॥

ध्यान गणेशाचें वर्णितां । मतिप्रकाश होये भ्रांता ।

गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥ २६॥

जयासि ब्रह्मादिक वंदिती । तेथें मानव बापुडे किती ।

असो प्राणी मंदमती । तेहीं गणेश चिंतावा ॥ २७॥

जे मूर्ख अवलक्षण । जे कां हीणाहूनि हीण ।

तेचि होती दक्ष प्रविण । सर्वविशईं ॥ २८॥

ऐसा जो परम समर्थ । पूर्ण करी मनोरथ ।

सप्रचीत भजनस्वार्थ । कल्लौ चंडीविनायेकौ ॥ २९॥

ऐसा गणेश मंगळमूर्ती । तो म्यां स्तविला येथामति ।

वांछ्या धरूनि चित्तीं । परमार्थाची ॥ ३०॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

गणेशस्तवननाम समास दुसरा ॥ २॥


आरती रामदासा

आरती रामदासा | 
भक्त विरक्त ईशा | 
उगवला ज्ञानसूर्य || 
उजळोनी प्रकाशा || धृ ||

साक्षात शंकराचा | 
अवतार मारुती | 
कलिमाजी तेचि झाली | 
रामदासाची मूर्ती || १ || आरती रामदासा ||

वीसही दशकांचा | 
दासबोध ग्रंथ केला | 
जडजीवां उद्धरिले |
नृप शिवासी तारीले || २ || आरती रामदासा ||

ब्रम्हचर्य व्रत ज्याचे | 
रामरूप सृष्टी पाहे | 
कल्याण तिही लोकी | 
समर्थ सद्गुरुपाय || ३ || आरती रामदासा ||

आरती तुकाराम

आरती तुकाराम । 
स्वामी सद्गुरु धाम ॥
सच्चिदानंद मूर्ती ।
पाय दाखवी आम्हा ॥

राघवे सागरात ।
पाषाण तारीले ॥
तैसे हें तुकोबाचे ।
अभंग उदकी रक्षिले ॥

तुकिता तुलनेसी ।
ब्रह्म तुकासी आले ॥
म्हणोनि रामेश्वरे ।
चरणी मस्तक ठेविले ॥

संतोषी मातेची आरती

मैं तो आरती उतारूं रे संतोषी माता की
मैं तो आरती उतारूं रे जय जय संतोषी माता जय जय मां
बडी ममता है बडा प्यार मां की आंखोंमें मां की आखोंमें
बडी करूणा माया दुलार मां की आंखोंमें मां की खांखामें
क्यूं न देखूं मैं बारबार मां की आंखों में
दिखे हर घडी नया चमत्कार मां की आंखोंमें
नृत्य करूं छुम छुम झम झमा झुम झुम झुम
झांकी निहारू रे ओ प्यारी प्यारी झांकी निहारू रे
सदा होती है जयजयकार मां के मंदिरमें मां के मंदिर में
नित्य झांझर की होए झनकार मां के मंदिरमें मां के मंदिरमें
सदा मंजिरे करते पुकार मां के मंदिर में
दिख हर घडी नया चमत्कार मां के मंदिरमें
दीप धरूं धूप करूं प्रेम सहित भक्ति करूं
जीवन सुधारू रे ओ प्यारा प्यारा जीवन सुधारू रे 
मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की
जय जय संतोषी माता जय जय मां जय जय मां

तुळसीमातेची आरती (वृंदावनवासी जय माये तुळसी)

वृंदावनवासी जय माये तुळसी । 
शिवहरिब्रह्मादिकां तूं वंद्य होसी । 
मृत्युलोकीं प्रकटुनि भक्तां उद्धरिसी । 
तुझें दर्शन होतां जळती अघराशी ।। १।। 

जय देवी जय देवी जय तुळसी माते । 
करि वृद्धि आयुष्या नारायणवनिते ।। धृ ।।

कार्तिक शुक्लद्वादशि कृष्णाशीं लग्न । 
तुझें वृंदावनीं निशिदिनिं श्रीकृष्ण । 
स्वर्गाहुनी वृष्टी करिती सुरगण । 
भक्त चिंतन करितां करिसी पावन । जय देवी || २ || 

त्रिभुवनीं तुझी सेवा करिती त्रिकाळ । 
त्यांतें सुख देउनी तारी गोपाळ । 
तुझें स्तवन ऐकुनि कांपति कळिकाळ । 
पावन करि मज म्हणे मोरो बल्लाळ । जयदेवी ।।३।।

तुळशीची आरती (जय देवी जय देवी जयं माये तुळशी)

जय देवी जय देवी जयं माये तुळशी । 
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळशी ।। धृ०।। 

ब्रह्मा केवळ मूळीं मध्यें तो शौरी । 
अग्र शंकर तीर्थे शाखापरिवारीं । 
सेवा करिती भावें सकळही नरनारी । 
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारीं ।। 
जय देव जय देवी ।।१।। 

शीतळ छाया भूतळ व्यापक तूं कैसी ।
मंजरीची आवड कमलारमणासी ।  
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी । 
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासीं ।। 
जय देवी जय देवी।। २ ।। 

अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझे पूजनकाळीं जो हे उच्चारी। 
त्यासी देसी संतिति संपत्ति सुखकारी । 
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ।। 
जय देवी जय देवी ।।३।।

तुळशीची आरती (तुळसीमूळमृत्तिका जो लावी भाळीं )

तुळसीमूळमृत्तिका जो लावी भाळीं । 
अनुदिनि तुळसीतीर्थी करितो आंघोळी । 
तुळसीकाष्ठीं ग्रीवा मंडित वनमाळी ।
त्याच्यासंगें राहे हरि सर्वकाळीं || १ ||

जय देवी जय देवी जय माये तुळसी । 
अक्षय मोक्षाचें निजपद भावें देसी ॥ धृ०॥

मंजरिया हो तुझ्या वज्राच्या धारा । 
पापाचे पर्वत जळती तनुभारा । 
आले यमकिंकर म्हणती रविकुमरा । 
तुळसीमूळें न दिसे पापासी थारा ।। जय || २|| 

तुझिया एका दळें सोडविले देव । 
म्हणुनी तुझ्या चरणीं धरिला दृढ भाव । 
वृंदे वस्तीसी तूं मज देई ठाव । 
मुक्तेश्वर म्हणे पें मुख्य सद्भाव ।। जय ।।३।।

श्रीमंगळागौरीची आरती (जयदेवी मंगळागौरी)

जयदेवी मंगळागौरी । 
सुवासिन मी तुला पुजिते ।।धृ।।

कुंकुमतिलक माझ्या लल्लाटी । 
मंगलमणी दे शोभत कंठी ।
रत्नपाचुचा चुडा मनगटी । 
स्त्रीजन्माचे अहेव लेणे । 
तुझ्या कृपेने मला लाभले ।।१।। 

शिवशंकराहूनी प्रेमळ भोळा । 
दिधलासी पति तू भाग्यवतीला । 
देहाच्या देवारी पुजीन त्याला । 
हृदयाची आरती प्राणांच्या ज्योती । 
अमृत तेजाळ प्रीत जळते ।।२।।

श्रीमंगळागौरीची आरती (मागू शाश्वत सौभाग्याप्रति गौरीला)

मागू शाश्वत सौभाग्याप्रति गौरीला । 
उजळू पंचारती तुजला ।। धृ०।। 

जमू सगळ्याजणी एक स्थळी । 
सात्त्विक वृत्ती आणुनी चित्ती । 
आसन करु स्थित मागू ।।१।। 

श्रावण मंगळवारी हिला । 
घालू स्नाने भरजरी वस्त्रे । 
कंचुक मौतिक मागू ।। २ ।। 

नेत्री अंजन घालू आधी | 
कंठी भूषण हाती कंकण । 
नासी नथ मग, मागू ।। ३ ।। 

पंचामृती ते पुजन करू । 
कुंकूम अबिरा शेंदुर बुक्का । 
वाहू अक्षता, मागू ।। ४ ।। 

षोडश परीची पत्री आणू । 
खाज्या करंज्या जिलब्या ताज्या । 
नैवेद्याप्रती, मागू ।। ५ ।। 

जन्मांतरीचे दुःख हरी । 
जाऊ शरणा दृढ धरी चरणा । 
कृष्णे समवेत, मागू ।। ६ ।।

श्रीमंगळागौरीची आरती (ओवाळू आरतीला मंगळागौरी तुजला)

ओवाळू आरतीला मंगळागौरी तुजला । 
सौभाग्य देई आम्हा हीच विनंती तुला ।। धृ०।। 

श्रावण मंगळवारी जमु सगळ्या आम्ही नारी । 
अर्पू वसन जरतारी तुजला बहुत प्रकारी । 
माला या सुमनांच्या अर्पूनी पुजनाला ।।१।। 

षोडश परीची पत्रे ठेवुनी या सत्पात्री । 
आनंदे आम्ही युवती वाहू तुज अति प्रोती । 
स्वीकारी पूजेला वंदीत तव चरणा ।। २ ।। 

वंदन करितो तुजला भक्तीने आम्ही बाला। 
दावीन सन्मार्गाला यास्तव नमू चरणाला । 
अज्ञानी आम्ही बाला तारिया सकला ।। ३ ।। 

प्रार्थी सुशी तभया ही चीर सौभाग्या देई । 
मागत नच तव काही ह्यावीण अंबाबाई । 
प्रेमाने परिसावे हीच विनंती तुला ।। ४।। 

श्रीमंगळागौरीची आरती (जय माये मंगळागौरी)

जय माये मंगळागौरी ।
तुजला पूजूं अंतरीं ।
नाना विधिउपचारीं ।
दीप ओंवाळूं सुंदरी ।। जय ।। धृ०।।  

मंगळागौरी नाम तुझें ।
तुला नमन असो माझें । 
भवदुःखाचे हें ओझें । 
देवी उतरावें सहजें ।। जय० ।। १ ।। 

गजाननाची तूं माता । 
शंकराची प्रियकांता । 
हिमाचलाची तूं दुहिता । 
मज तारि तारि आतां ।। जय ।। २।। 

लागे तुझ्या चरणाशीं । 
जाळी पापांचिया राशी ।
भक्ति ठसावी मानसीं । 
अंबे न्यावें पायांपाशीं ।। जय ।। ३।।  

गौरी ओंवाळीते दीप ।
नेणें तुझें नाम रूप ।
वाढवावें सौभाग्य अमूप । 
विश्वाची तूं मायबाप ।। जय ।।४।।
 
रिकामी ही खटपट ।
शुद्ध मार्गी लावी नीट । 
परब्रह्म घनदाट ।
द्यावी नारायणीं भेट ।
तुजला पूजूं अंतरीं ।। जय।। ५।। 

श्रीमंगळागौरीची आरती (जयदेवी मंगळागौरी ओंवाळीन सोनिया ताटीं)


जयदेवी मंगळागौरी । 
ओंवाळीन सोनिया ताटीं । 
रत्नांचे दिवे । 
माणिकांच्या वाती । 
हिरेया मोती ज्योती ।।धृ।।

मंगलमूर्ती उपजली कार्या । 
प्रसन्न झाली अल्पायुशी राया । 
तिष्ठली राज्यवाळी । 
आयोपण द्यावया ।। जय० ।।१।।

पूजेला ग आणिती जाई जुईच्या कळ्या । 
सोळा तिकटी सोळा दूर्वा । 
सोळी परींची पत्री । 
जाई जुई आबुल्या ।
शेवंती नागचांफे । 
पारिजातकें मनोहरें । 
गोकर्ण महाफुलें । 
नंदेटें तगरें । 
पूजेला ग आणिलीं ।। जय ।।२।।

साळीचे तांदूळ मुगाची डाळ ।
आळणी खिचडी रांधिती नारी ।
आपुल्या पतिलागीं ।
सेवा करिती फार ।। जय० ।।३।।

डुम डुम डुम डुम वाजंत्री वाजती ।
कळावी कांकणें गौरीला शोभती ।
शोभती बाजुबंद ।
कानीं कापांचे गबे । 
ल्यायिली अंबा शोभे ।। जय० ।। ४।। 

न्हाऊनी भाखुनी मौनी बैसली । 
पाटावाची चोळी क्षीरोदक नेसली । 
स्वच्छ बहुत होउनी ।
अंबा पूजूं बैसली ।। जय  ।।५।।

सोनियाच्या ताटीं घातिल्या पंचारती ।
मध्यें उजळती कापुराच्या वाती ।
करा धूप दीप ।
आतां नैवेद्य षड्स पक्वान्नें ।
ताटीं भरा बोनें ।। जय. ।।६।। 

लवलाह तिघें काशीसी निघालीं । 
माउली मंगळागौर भिजवूं विसरली ।
मागुती परतुनियां आली ।
अंबा स्वयंभू देखिली ।
देऊळ सोनियाचें ।
खांब हिरेयांचे ।
कळस मोतियांचा ।। जय० ।।७।।

श्रीकृष्णाची आरती (ओंवाळं आरती मदनगोपाळा)

ओंवाळं आरती मदनगोपाळा । 
श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा ।। धृ०॥ 

चरणकमल ज्याचे अति सुषुमार।। 
ध्वजवज्रांकुश ब्रीदांचे तोडर ।। १ ।।

नाभिकमलीं ज्याचे ब्रह्मयाचें स्थान ।। 
हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांच्छन।। २।। 

मुखकमल पाहतां सूर्याच्या कोटी ।। 
मोहियलें मानस कोंदियेली दृष्टी ।।३।।

जडित मुगुट ज्याचा दैदीप्यमान।। 
तेणे तेजें कोंदलेंअवघें त्रिभुवन ।।४।। 

एका जनार्दनीं देखियेलें रूप ।। 
रूप पाहों जातां झालें तद्रूप ।।५।। 

ओंवाळूं आरती मदनगोपाळा ।।

ॐ जय जगदीश हरे

ॐ जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे । 
भक्त जनों के संकट । दास जनों के संकट क्षण में दूर करे ।।धृ०।। 

जो ध्यावे फल पावे । दुःख विनसे मन का । 
स्वामी दुःख विनसे मन का । सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का ।।ॐ ।। १ ।।

मात पिता तुम मेरे । शरण पहूं मैं किसकी । 
स्वामी शरण गहूं मैं किसकी । तुम बिन और न दूजा । 
आस करूँ जिसकी ।। ॐ।। २ ।। 

तुम पूरण परमात्मा तुम अंतरयामी । स्वामी तुम अंतरयामी । 
परब्रम्हा परमेश्वर । परब्रम्हा परमेश्वर । 
तुम सबके स्वामी ।। ॐ ।। ३ ।।

तुम करूणाके सागर । तुम पालनकर्ता । 
स्वामी तुम पालनकर्ता । मैं मूरख फल कामी मै सेवक तुम स्वामी । 
कृपा करो भर्ता ।। ॐ ।।४।। 

तुम हो एक अगोचर। सबके प्राणपति । 
स्वामी सबके प्राणपति, किस विधि मिलूं दयामय । 
तुमको मैं कुमति ।। ॐ।। ५ ।। 

दीनबंधु दुखहर्ता । ठाकूर तुम मेरे । 
स्वामी रक्षक तुम मेरे । अपने हाथ उठाओ । 
अपनी शरण लगाओ द्वार पडा तेरे ।। ॐ ।। ६ ।। 

विषय विकार मिटाओ । पाप हरो देवा । 
स्वामी पाप हरो देवा । श्रद्धा भक्ती बढाओ श्रद्धा भक्ती बढाओ। 
संतनकी सेवा ।। ॐ ।। ७ ।।

श्रीगणराजाची आरती

स्थापित प्रथमारंभी तुज मंगलमुर्ती । 
विघ्ने वारूनि करिसी दीनेच्छा पुरती । 
ब्रह्मा विष्णु महेश तीघे स्तुति करिती ।
सुरवर मुनिवर गाती तुझिया गुणकिर्ती ।। १।। 

जयदेव जयदेव जय गणराजा । 
आरती ओवाळू तुजला महाराजा ।। धृ ।। 

एकदंता स्वामी हे वक्रतुंडा । 
सर्वाआधी तुझा फडकतसे झेंडा । 
लप लप लप लप लप लप हालति गत शुंडा । 
गप गप मोदक भक्षिसी घेऊनि करि उंडा ।। जयदेव ।। २ ।।

शेंदूर अंगी चर्चित शोभत वेदभुता । 
कर्णी कुंडल झळके दिनमणि उदय तुझा । 
परशांकुश करि तळपे मुषक वहनादुजां। 
नाभी कमळावरती खेळत फणिराजा ।।  जयदेव ।।  ३ ।। 

भाळी केशरीगंधावर कस्तुरी टिळा । 
हिरे जडित कंठी मुक्ताफळ माळा ।
माणिकदास शरण तुज पार्वतिबाळा । 
प्रेमे आरती ओवाळित वेळोवेळा ।। जयदेव ।।  ४ ।। 

श्रीज्ञानदेवाची आरती

आरती ज्ञानराजा । 
महाकैवल्य तेजा। 
सेविती साधुसंत ।
मनु वेधला माझा ॥ आरती० ॥धृ०॥ 

लोपलें ज्ञान जगी । 
हित नेणती कोणी । 
अवतार पांडुरंग । 
नाम ठेविलें ज्ञानी ।। आ० ॥ १॥

कनकाचे ताट करीं । 
उभ्या गोपिका नारी । 
नारद तुंबर हो । 
साम-गायन करी ।। आ० ॥२॥ 

प्रकट गुह्य बोले । 
विश्व ब्रह्मचिं केलें ।
रामा जनार्दनीं । 
पायीं मस्तक ठेविलें ।। आरती० ॥ ३॥

येई हो विठ्ठले माझे माऊली ये

येई हो विठ्ठले माझे माऊली ये । 
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे ।। धृ०।। 

आलिया गेलिया हाती धार्डी निरोप । 
पंढरपुरी आहे माझा मायबाप ।। येई०।। १ ।। 

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला । 
गरूडावरी बैसूनि माझा कैवारी आला ।। येई० ।। २ ।।

विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।। 
विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी ।। येई०।। ३ ।। 

असो नसो भाव आम्हां तुझीया ठायीं । 
कृपादृष्टी पाहे माझ्या पंढरीराया ।। येई ० ।। ४ ।।

पसायदान

आतां विश्वात्मकें देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥१॥

जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मी रति वाढो ।
भूतां परस्परें पडो | मैत्र जीवांचे ॥२॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो।
जो जे वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥३॥

वर्षत सकळा मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥४॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचे गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥५॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन | सोयरे होतु ॥६॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊन तिहीं लेकीं ।
भजिजो आदिपुरुषीं । अखंडित ॥७॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इये ।
दृष्टादृष्टविजयें । होआवें जी ॥८॥

येथे म्हणे श्री विश्वेश्वरावो । हा होईल दानपसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥९॥

घालीन लोटांगण

घालीन लोटांगण, वंदीन चरण | 
डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ।
प्रेमे आलिंगीन, आनंदे पुजिन | 
भावे ओवाळिने म्हणे नामा ॥१॥

त्वमेव माता च पिता त्वमेव । 
त्वमेव बंधुश्व सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । 
त्वमेव सर्व मम देवदेव ||२||

कायेन वाचा मनसेन्द्रिर्येर्वा 
बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात्
करोमि यद्यत् सकलं परस्मै, 
नारायणायेति समर्पयामि ||३||

अच्युतं केशवं रामनारायणं 
कृष्णदामोदरं वासुदेव हरिम् 
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, 
जानकीनायकमं रामचंद्र भजे ||४||

हरे राम हरे राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे।

निरोपगीत (जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा)

जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, नमितो तव चरणा ॥
वारूनिया विघ्ने देवा रक्षावे दीना || धृ ||

दास तुझे आम्ही देवा तुजलासी ध्यातो ॥
प्रेमे करूनिया देवा गुण तुझे गातो ॥ जा ॥१॥

तरी द्यावी सिद्धि देवा हेचि वासना, देव हेचि वासना ॥
रक्षुनिया सर्वा द्यावी आम्हांसी आज्ञा ॥ जा ॥२॥

मागणे ते देवा आता एकचि आहे ॥
तारूनिया सकळा आम्हा कृपादृष्टी पाहे ॥जा ॥३॥

जेव्हा सर्व मिळू ऐशा या ठाया, ऐशा या ठाया ॥
प्रेमानंदे लागू तुझी कीर्ती गावया ॥ जा ॥४॥

सदा ऐशी भक्ती राहो आमुच्या मनी, आमुच्या मनी ॥
हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ॥जा ॥५॥

वारूनिया संकटे आता आमुची सारी, आता आमुची सारी ।
कृपेची साउली देवा दीनावरी करी ॥ जा ॥६॥

निरंतर आमुची चिंता तुम्हा असावी ॥ चिंता तुम्हा असावी ॥
सर्वाची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ॥ जा ॥७॥

निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, आज्ञा असावी ॥
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ॥ जाहले.॥८॥

श्रीगणपती स्तोत्र (प्रणम्य शिरसा देवं)


प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ||
भक्तावासं स्मरेत्रित्यमायुः कामार्थसिद्धये ॥ १ ॥

प्रथमं वक्रतुंड च एकदंतं द्वितीयकम् ।।
तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ||२||

लंबोदर पंचमं च षष्ठं विकटमेव च ॥
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टमम् ||३||

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् ||
एकादशं गणपतिं द्वादशं तू गजाननम् ||४||

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नर: ॥
न च विघ्नभयं तस्यं सर्वसिद्धिकरं प्रभो ।।५।।

विद्यार्थी लाभते विद्यां धनार्थी लाभते धनम् ॥
पुत्रार्थी लाभते पुत्रान्मोक्षार्थी लाभते गतिम् ॥६॥

जपेद्रणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै फलं लाभेत् ॥
संवत्सरेण सिद्धी च लाभते नात्र संशयः ॥७॥

अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत ॥
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥८॥

॥इति संकष्टनाशन नाम श्री गणपतिस्तोत्रं संपूर्णम् ॥

श्रीमारुतीची आरती

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनीं ॥
कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनीं ।
सुरवर नर नीशाचर त्यां झाल्या पळणी ॥१॥

जय देव जय देव जय श्री हनुमंता ।
तुमचनी प्रसादें न भीं कृतांता ॥धृ॥

दुमदुमलीं पाताळें उठिला प्रतिशब्द ।
थरथरला धरणीधन मानीला खेद ।
कडाडिले पर्वत उड्डगणउच्छेद ।
रामी रामदासा शक्तीचा शोध ॥ जय. ॥२॥

श्रीहरितालिकेली आरती

जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ॥
आरती ओवाळीते । ज्ञानदिपेकलिके ॥धृ.॥

हर अर्धागी वससी । जासी यज्ञा माहेरासी ||
तेथे अपमान पावसी ॥ यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय ॥ १॥

रिघसी हिमाद्रीच्या पोटी । कन्या होसी तू गोमटी ॥ 
ॐ उग्र तपश्चार्या मोठी । आचरसी उठाउठी ॥ जय ||२||

तापपंचग्रिसाधने |धूम्रपान आधोवदने ||
केली बहु उपोषणे । शंभु भ्रतारकारणे || जय ||३||

लीला दाखविसी दृष्टी । हे व्रत करिसी लोकांसाठी ॥
पुन्हा वरिसी धूर्जटी | मज रक्षावे संकटी ॥जय ॥४॥

काय वर्णू तव गुण ॥ अल्पमति नारायण ॥
माते दाखवी चरण । चुकवावे जन्ममरण ॥ जय ॥५॥

श्रीदशावताराची आरती

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परबह्म ।
भक्तसंकटी नाना स्वरूपी स्थापीसी स्वधर्म ॥धृ.॥

अंबऋषीकारणे गर्भवास सोशीसी ॥
वेदे नेले चोरूनी ब्रह्मया आणुनिया देसी ॥
मत्स्यरूपी नारायणा सप्तही सागर धुंडीसी ॥
हस्त तुझा लागता शंखासुरा तुझा वर देसी ॥ आरती ॥१॥

रसातळासी जाता पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकरासाठी देवा कासव झालासी ।
दाढे धरूनी पृथ्वी नेता वराहरूप होसी ॥
प्रल्हादकारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी || आरती ||२||

पाचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी ॥
भिक्षे स्थळ मागुनी बळीला पाताळा नेसी ॥
सर्व समर्पण केले म्हणूनी प्रसन्न त्या होसी ॥
वामनरूप धरूनी बळिच्या द्वारी तिष्ठसी ॥ आरती ||३||

सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला ॥
कष्टी ते रेणुका म्हणूनी सहस्त्राजून वधिला ॥
नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ॥
सहावा अवतार परशुराम प्रगटला ||आरती ॥४॥

मातला रावण सर्वा उपद्रव केला ॥
'तेहतिस कोटी देव बंदी हरिले सीतेला ॥
पितृवचनालागी रामे वनवासी केला ॥
मिळोनी वानरसहित राजा राम प्रगटला ॥ आरती ॥५॥

देवकीवसुदेव बंदमोचन त्वां केले ॥
नंदाघरी जाऊनी निजसुख गोकुळ दिधले ||
गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले ॥
गोपिकांचे प्रेम देखुनी श्रीकृष्ण भुलले ॥आरती ॥६॥

बोद्ध कलंकी कलियुगी अधर्म हा अवघा ||
सांडुनि नित्यधर्म सोडूनी नंदाची सेवा ॥
म्लेंछमर्दन करिसी म्हणोनी कलंकी केशवा ॥
बहिरवी जान्हवी द्यावी निजसुखानंदा सेवा ॥
आरती सप्रेम जय जय विठ्ठल ॥७॥

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा 
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिका चे भेटी परब्रह्म आलेंगा। 
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ॥१॥
जयदेव जयदेव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा
राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ॥

तुळशीमाळ गळा कर ठेवूनी कटीं । 
कांसे पितांबर कस्तुरी लल्लाटी ॥
देव सुरवर नित्य येती भेटी । 
गरूड हनुमंत पुढे उभे राहती ॥
जयदेव जयदेव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा
राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥२॥

धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा । 
सुवर्णाची कमळे वनमाळा गळां ।
राई रखुमांबाई राणीया सकळा। 
ओवाळिता राज विठोबा सावळां ॥
जयदेव जयदेव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा
राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥३॥

ओवाळूं आरत्या कुर्वंड्या येती । 
चंद्रभागेमाजीं सोडुनिया देती।
दिंड्या पताका वैष्णव नाचती । 
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥
जयदेव जयदेव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा
राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥४॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती । 
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ।
दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती । 
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥
जयदेव जयदेव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा
राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥५॥

त्रिगुणत्मक त्रैमूर्ती दत्ता हा जाणा

त्रिगुणत्मक त्रैमूर्ती दत्ता हा जाणा  
त्रिगुण अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द नये अनुमाया 
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना 
जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता । 
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥धृ॥

सबाह्य-अभ्यंतरी तूं एक दत्त । 
अभाग्यासी कैची कळेल ही मात ।
पराहिपरतली तेथ कैचा हेत । 
जन्ममरणाचाही पुरलाचे अंत 
जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता  
आरती ओवाळिता हरली भवचिंता ||१||

दत्त येऊनिंया उभा ठाकला । 
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।
प्रसन्न होउन आशीर्वाद दिधला । 
जन्मामरणाचा फेरा चुकविला 
जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता । 
आरती ओवाळिता हरली भवचिंता ||२||

दत्त दत्त ऐसे लागलें ध्यान । 
हरपले मन झाले उन्मन
मी-तूं पंणाची झाली बोळवण । 
एकाजनार्दनी श्री दत्तध्यान 
जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता 
आरती ओवाळिता हरली भवचिंता ||३||

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । 
विषें कंठे काळा त्रिनेत्री ज्वाळा।
लावण्य सुंदर मस्तकीं बाळा । 
तेथनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा
जयदेव जयदेव जय श्रीशंकरा । 
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥धृ॥

कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा । 
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभूतीचे उधळण शितिकंठ निळा । 
ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळ 
जयदेव जयदेव जय श्रीशंकरा । 
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ||१||

देवी दैत्यी सागरमंथ पै केले । 
त्यामाजी जे अवचित हळाहळ उठिले ।
तें त्वां असुरपणे प्राशन केले। 
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले 
जयदेव जयदेव जय श्रीशंकरा । 
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥२॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । 
पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी  
रघुकुलतिलक रामदासा अंतरी 
जयदेव जयदेव जय श्रीशंकरा । 
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥३॥

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी 
वारी वारी जन्ममरणातें वारी ।
हरी पडलो आता संकट निवारी ॥१॥

जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी
सुरवरईश्वरवरदे तारकसंजीवनी ॥धृ॥

त्रिभुवनभुवती पाहतां तुज ऐसी नाही ।
चारी श्रमलो परंतु न बोलवे काही ।
साहीं विवाद करिंता पडलो प्रवाही 
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही 
जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी 
सुरवरईश्वरवरदे तारकसंजीवनी ||१||

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासुनि सोडवि तोडी भवपाशा ।
अंबे तुजवांचून कोण पुरवील आशा ।
नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा 
जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी 
सुरवरईश्वरवरदे तारकसंजीवनी ॥२॥

गजानना श्री गणराया

गजानना श्री गणराया । 
आधी वंदू तुज मोरया ।
मंगलमूर्ती श्री गणराया । 
आधी वंदू तुज मोरया ॥१॥

सिंदूरचर्चित धवळे अंग । 
चंदन उटी खुलवी रंग ।
बघता मानस होते दंग । 
जीव जडला चरणीं तुझिया ॥२॥

गौरीतनया भालचंद्रा । 
देवा कृपेच्या तु समुद्र ।
वरदविनायका करुणागारा । 
अवर्धी विघ्नें नेसी विलया ॥३॥

तूं सुखकर्ता तूं दुखहर्ता विघ्नविनाशक मोरया

तूं सुखकर्ता तूं दुखहर्ता विघ्नविनाशक मोरया ।
संकटीं रक्षी शरण तुला मी, गणपतीबप्पा मोरया ||धृ||

मंगलमूर्ती तूं गणनायक, वक्रतुंड तू सिद्धीविनायक |
तुझिया दारी आज पातलों, नेईं स्थितिप्रति राया ॥१॥

तू सकलांचा भाग्यविधाता, तू विद्येचा स्वामी दाता ।
ज्ञानदीप उजळून आमुचा, निमवी नैराश्याला ||२||

तू माता, तू पिता जगीं या, ज्ञाता तू सर्वस्व जगीं या ।
पामर मी स्वर उणे भासती, तुझी आरती गाया ॥३॥
मंगलमूर्ती मोरया । गणपती बाप्पा मोरया ॥

श्रीगणेशोत्सवातील आरती

श्री गणपती स्थापना प्राणप्रप्तिष्ठा विधी श्रीगणपतीची आरती १. सुखकर्ता दुःखहर्ता २. नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमीपत्रें ३. उंदिरावरी बैसोनी ४....