नमस्कार,
मी अभिजीत विलास पातकर, रा. ऐरोली, नवी मुंबई, ता. ठाणे, जि. ठाणे, महाराष्ट्र.
सध्याचं युग हे technology युग आहे आणि आता काही दिवसात 5G हि चालू होणार आहे त्यामुळे पुढे इंटरनेट शिवाय मनुष्याचं पान हि हलू शकणार नाही. ज्याच्या त्याच्या हात स्मार्ट फोन आहे आणि सर्व गोष्टी मनुष्य आता हातात असलेल्या मोबाईल मध्येच पहात आहे. सुरवातीला बँकचे व्यवहार मनुष्य बँकेत जाऊनच करत असत, पण मोबाईलमुळे आता तेही आता सोप झालं आहे. माणसाने प्रगती करणे हि काळाची गरज आहेच, आणि ती केलीही पाहिजे. पण ह्याच technology चा वापर आपण आपली संस्कृती टिकवण्यासाठीही करू शकतो ना? त्यासाठीच मी हा एक प्रयत्न केला आहे. आता आपले सर्व हिंदू धर्माचे सण सुरु होतील , गणेशोत्सव त्यानंतर नवरात्र उत्सव असेल. म्हणून मी एक नवीन ब्लॉग बनवत आहे, ह्या मध्ये गणेशोत्सवामध्ये ज्या ज्या देवांच्या आरत्या आणि भजन गायले जातात त्याचं ह्या ब्लॉग मध्ये सविस्तर शब्दांच्या रुपात मांडल्या आहेत. म्हणजे केव्हाही आणि कुठेही ह्याचा आनंद कोणत्याही क्षणी आपण घेऊ शकतो. कृपया तुमची साथ ह्या उपक्रमात मला मिळावी हि विनंती. आपण हा ब्लॉग सर्वाना share करून हा अनमोल ठेवा सर्वांपर्यंत पोहोचवावा हि नम्र विनंती.
धन्यवाद !!!!!!
Blogspot : https://abhijeets-way.blogspot.com/
Like करा ..... share करा .... Subsrcibe करा
YouTube Channel : Abhijeet's Way
Facebook Page : Abhijeet's Way
Instagram ID : abhijeetsway
No comments:
Post a Comment