जय माये मंगळागौरी ।
तुजला पूजूं अंतरीं ।
नाना विधिउपचारीं ।
दीप ओंवाळूं सुंदरी ।। जय ।। धृ०।।
मंगळागौरी नाम तुझें ।
तुला नमन असो माझें ।
भवदुःखाचे हें ओझें ।
देवी उतरावें सहजें ।। जय० ।। १ ।।
गजाननाची तूं माता ।
शंकराची प्रियकांता ।
हिमाचलाची तूं दुहिता ।
मज तारि तारि आतां ।। जय ।। २।।
लागे तुझ्या चरणाशीं ।
जाळी पापांचिया राशी ।
भक्ति ठसावी मानसीं ।
अंबे न्यावें पायांपाशीं ।। जय ।। ३।।
गौरी ओंवाळीते दीप ।
नेणें तुझें नाम रूप ।
वाढवावें सौभाग्य अमूप ।
विश्वाची तूं मायबाप ।। जय ।।४।।
रिकामी ही खटपट ।
शुद्ध मार्गी लावी नीट ।
परब्रह्म घनदाट ।
द्यावी नारायणीं भेट ।
तुजला पूजूं अंतरीं ।। जय।। ५।।
No comments:
Post a Comment