लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रें ॥
ऐसें पूजन केल्या बीजाक्षर मंत्रे ।
अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कँची स्फूर्ती ॥धृ॥
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ॥
त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरती ॥
वाजी वारण शिबीका सेवक सुत युवती
सर्वही पावुनि अंती भवसागर तरती ||२||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥धृ॥
शरणागत सर्वस्वें भजती तव चरणीं ॥
कीर्ति तयांची राहे जोंवर शशि तरणी ॥
त्रैलोक्यीं ते विजयी अद्भुत हें करणी ॥
गोसावीनंदन रत नामस्मरणीं ॥३॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फर्ती ॥धृ॥
No comments:
Post a Comment