मागू शाश्वत सौभाग्याप्रति गौरीला ।
उजळू पंचारती तुजला ।। धृ०।।
जमू सगळ्याजणी एक स्थळी ।
सात्त्विक वृत्ती आणुनी चित्ती ।
आसन करु स्थित मागू ।।१।।
श्रावण मंगळवारी हिला ।
घालू स्नाने भरजरी वस्त्रे ।
कंचुक मौतिक मागू ।। २ ।।
नेत्री अंजन घालू आधी |
कंठी भूषण हाती कंकण ।
नासी नथ मग, मागू ।। ३ ।।
पंचामृती ते पुजन करू ।
कुंकूम अबिरा शेंदुर बुक्का ।
वाहू अक्षता, मागू ।। ४ ।।
षोडश परीची पत्री आणू ।
खाज्या करंज्या जिलब्या ताज्या ।
नैवेद्याप्रती, मागू ।। ५ ।।
जन्मांतरीचे दुःख हरी ।
जाऊ शरणा दृढ धरी चरणा ।
कृष्णे समवेत, मागू ।। ६ ।।
No comments:
Post a Comment