वृंदावनवासी जय माये तुळसी ।
शिवहरिब्रह्मादिकां तूं वंद्य होसी ।
मृत्युलोकीं प्रकटुनि भक्तां उद्धरिसी ।
तुझें दर्शन होतां जळती अघराशी ।। १।।
जय देवी जय देवी जय तुळसी माते ।
करि वृद्धि आयुष्या नारायणवनिते ।। धृ ।।
कार्तिक शुक्लद्वादशि कृष्णाशीं लग्न ।
तुझें वृंदावनीं निशिदिनिं श्रीकृष्ण ।
स्वर्गाहुनी वृष्टी करिती सुरगण ।
भक्त चिंतन करितां करिसी पावन । जय देवी || २ ||
त्रिभुवनीं तुझी सेवा करिती त्रिकाळ ।
त्यांतें सुख देउनी तारी गोपाळ ।
तुझें स्तवन ऐकुनि कांपति कळिकाळ ।
पावन करि मज म्हणे मोरो बल्लाळ । जयदेवी ।।३।।
No comments:
Post a Comment