विषें कंठे काळा त्रिनेत्री ज्वाळा।
लावण्य सुंदर मस्तकीं बाळा ।
तेथनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा।
जयदेव जयदेव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥धृ॥
कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभूतीचे उधळण शितिकंठ निळा ।
ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळ ।
जयदेव जयदेव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ||१||
देवी दैत्यी सागरमंथ पै केले ।
त्यामाजी जे अवचित हळाहळ उठिले ।
तें त्वां असुरपणे प्राशन केले।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले
जयदेव जयदेव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥२॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुलतिलक रामदासा अंतरी
जयदेव जयदेव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥३॥
No comments:
Post a Comment