जयदेवी मंगळागौरी ।
ओंवाळीन सोनिया ताटीं ।
रत्नांचे दिवे ।
माणिकांच्या वाती ।
हिरेया मोती ज्योती ।।धृ।।
मंगलमूर्ती उपजली कार्या ।
प्रसन्न झाली अल्पायुशी राया ।
तिष्ठली राज्यवाळी ।
आयोपण द्यावया ।। जय० ।।१।।
पूजेला ग आणिती जाई जुईच्या कळ्या ।
सोळा तिकटी सोळा दूर्वा ।
सोळी परींची पत्री ।
जाई जुई आबुल्या ।
शेवंती नागचांफे ।
पारिजातकें मनोहरें ।
गोकर्ण महाफुलें ।
नंदेटें तगरें ।
पूजेला ग आणिलीं ।। जय ।।२।।
साळीचे तांदूळ मुगाची डाळ ।
आळणी खिचडी रांधिती नारी ।
आपुल्या पतिलागीं ।
सेवा करिती फार ।। जय० ।।३।।
डुम डुम डुम डुम वाजंत्री वाजती ।
कळावी कांकणें गौरीला शोभती ।
शोभती बाजुबंद ।
कानीं कापांचे गबे ।
ल्यायिली अंबा शोभे ।। जय० ।। ४।।
न्हाऊनी भाखुनी मौनी बैसली ।
पाटावाची चोळी क्षीरोदक नेसली ।
स्वच्छ बहुत होउनी ।
अंबा पूजूं बैसली ।। जय ।।५।।
सोनियाच्या ताटीं घातिल्या पंचारती ।
मध्यें उजळती कापुराच्या वाती ।
करा धूप दीप ।
आतां नैवेद्य षड्स पक्वान्नें ।
ताटीं भरा बोनें ।। जय. ।।६।।
लवलाह तिघें काशीसी निघालीं ।
माउली मंगळागौर भिजवूं विसरली ।
मागुती परतुनियां आली ।
अंबा स्वयंभू देखिली ।
देऊळ सोनियाचें ।
खांब हिरेयांचे ।
कळस मोतियांचा ।। जय० ।।७।।
No comments:
Post a Comment