पसायदान

आतां विश्वात्मकें देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥१॥

जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मी रति वाढो ।
भूतां परस्परें पडो | मैत्र जीवांचे ॥२॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो।
जो जे वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥३॥

वर्षत सकळा मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥४॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचे गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥५॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन | सोयरे होतु ॥६॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊन तिहीं लेकीं ।
भजिजो आदिपुरुषीं । अखंडित ॥७॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इये ।
दृष्टादृष्टविजयें । होआवें जी ॥८॥

येथे म्हणे श्री विश्वेश्वरावो । हा होईल दानपसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥९॥

No comments:

Post a Comment

श्रीगणेशोत्सवातील आरती

श्री गणपती स्थापना प्राणप्रप्तिष्ठा विधी श्रीगणपतीची आरती १. सुखकर्ता दुःखहर्ता २. नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमीपत्रें ३. उंदिरावरी बैसोनी ४....