त्रिगुणत्मक त्रैमूर्ती दत्ता हा जाणा

त्रिगुणत्मक त्रैमूर्ती दत्ता हा जाणा । 
त्रिगुण अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द नये अनुमाया ।
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ।
जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता । 
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥धृ॥

सबाह्य-अभ्यंतरी तूं एक दत्त । 
अभाग्यासी कैची कळेल ही मात ।
पराहिपरतली तेथ कैचा हेत । 
जन्ममरणाचाही पुरलाचे अंत ।
जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता । 
आरती ओवाळिता हरली भवचिंता ||१||

दत्त येऊनिंया उभा ठाकला । 
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।
प्रसन्न होउन आशीर्वाद दिधला । 
जन्मामरणाचा फेरा चुकविला ।
जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता । 
आरती ओवाळिता हरली भवचिंता ||२||

दत्त दत्त ऐसे लागलें ध्यान । 
हरपले मन झाले उन्मन
मी-तूं पंणाची झाली बोळवण । 
एकाजनार्दनी श्री दत्तध्यान ।
जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ||३||

No comments:

Post a Comment

श्रीगणेशोत्सवातील आरती

श्री गणपती स्थापना प्राणप्रप्तिष्ठा विधी श्रीगणपतीची आरती १. सुखकर्ता दुःखहर्ता २. नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमीपत्रें ३. उंदिरावरी बैसोनी ४....