जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ॥
आरती ओवाळीते । ज्ञानदिपेकलिके ॥धृ.॥
हर अर्धागी वससी । जासी यज्ञा माहेरासी ||
तेथे अपमान पावसी ॥ यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय ॥ १॥
रिघसी हिमाद्रीच्या पोटी । कन्या होसी तू गोमटी ॥
ॐ उग्र तपश्चार्या मोठी । आचरसी उठाउठी ॥ जय ||२||
तापपंचग्रिसाधने |धूम्रपान आधोवदने ||
केली बहु उपोषणे । शंभु भ्रतारकारणे || जय ||३||
लीला दाखविसी दृष्टी । हे व्रत करिसी लोकांसाठी ॥
पुन्हा वरिसी धूर्जटी | मज रक्षावे संकटी ॥जय ॥४॥
काय वर्णू तव गुण ॥ अल्पमति नारायण ॥
माते दाखवी चरण । चुकवावे जन्ममरण ॥ जय ॥५॥
No comments:
Post a Comment