सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।।१।।
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ।।
दर्शनमात्रे मनः कामना पुरती ।। जयदेव जयदेव ॥ धृ०॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरें चरणी घागरिया ॥ २॥
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ।।
दर्शनमात्रे मनः कामना पुरती ।। जयदेव जयदेव ॥ धृ०॥
लंबोदर पितांबर फणिवरबंधना।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणी रक्षावें सुखरवंदना ॥ ३॥
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ।।
दर्शनमात्रे मनः कामना पुरती ।। जयदेव जयदेव ॥ धृ०॥
No comments:
Post a Comment