उंदिरावरी बैसोनी

उंदिरावरी बैसोनी दुडादुडां येसी । 
हातीं मोदक लाडू घेऊनियां खासी ॥
भक्तांचे संकटी धांवूनि पावसी ॥ 
दास विनविती तुझिया चरणांसी ॥१॥
जय देव जय देव जय गणराजा ॥
 सकळ देवाआधी तूं देव माझा ॥धृ॥

भाद्रपदमासी होसी तूं भोळा ॥ 
आरक्त पुष्पांच्या घालुनियां माळा ॥
कपाळि लावूंनी कस्तुरी टिळा || 
तेणे तु दिससी सांवळा माळा||
जय देव जय देव जय गणराजा ॥ 
सकळ देवाआधी तूं देव माझा ||२||

प्रदोषाचे दिवशीं चंद्र शापिला ॥ 
समयीं देवें मोठा आकांत केला ॥
इंदू येवोनी चरणीं लागला ॥ 
श्रीरामा बहुत शाप दिधला ॥
जय देव जय देव जय गणराजा ॥ 
सकळ देवाआधीं तूं देव माझा ॥३॥

पार्वतीच्या सुता तुं ये गणनाथा ॥ 
नेत्र शिणले तुझी वाट पाहतां ॥
किती अंत पाहसी बां विघ्नहर्ता ॥ 
मजला बुद्धि देई तूं गणनाथा ॥
जय देव जय देव जय गणराजा ॥ 
सकळ देवाआधीं तू देव माझा ॥४॥

No comments:

Post a Comment

श्रीगणेशोत्सवातील आरती

श्री गणपती स्थापना प्राणप्रप्तिष्ठा विधी श्रीगणपतीची आरती १. सुखकर्ता दुःखहर्ता २. नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमीपत्रें ३. उंदिरावरी बैसोनी ४....